कोल्हापूरातील अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनचा पुरस्कार
ओटवणे प्रतिनिधी
विलवडे शाळा नं २ चे उपक्रमशील मुख्याध्यापक सुरेश काळे यांना कोल्हापूर येथील अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सांगली येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपिठावर फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ संतोष भोसले, प्रदेश महिला संघटक सुचेता कलाजे, कार्यक्रम समन्वयक उमेश पाटील, ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरेश काळे यांनी गेल्या अडीच दशकात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमच नाही तर विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नैपुण्य प्राप्त करून दिले. तसेच आदर्श विद्यार्थी घडविताना शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह कला क्रीडा व सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनाही विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून आधार मिळून दिला.त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मुख्याध्यापक सुरेश काळे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे माजी उपसभापती कृष्णा सावंत, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी, माजी सरपंच रावजी दळवी, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, आविष्कारचे उपाध्यक्ष महेंद्र चव्हाण, केंद्रप्रमुख संदीप गवस, सावंतवाडी गट साधन केंद्राचे सर्व विषय तज्ञ, ग्रामपंचायत सदस्य अपर्णा दळवी, अंगणवाडी सेविका सायली दळवी, मनाली दळवी यांनी अभिनंदन केले आहे.









