केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती
नवी दिल्ली
डिमॅट खात्यांची संख्या 2019-20 मध्ये 4.1 कोटी इतकी होती, त्या तुलनेत 2022-23 मध्ये ती आता 10 कोटी झाली आहे, असे ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 कार्यक्रमामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
म्युच्युअल फंड आणि एसआयपी आता विक्रमी संख्येत नोंदवले जात आहेत. फिनटेकला नवोपक्रमाची गरज असताना, विविध जोखमींचा सामना करण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करणे तितकेच महत्त्वाचे आहे,
महत्त्वाच्या मांडलेल्या बाबी…
1.क्रिप्टोकरन्सीसाठी फ्रेमवर्क आवश्यक आहे.
सीतारामन म्हणाल्या की क्रिप्टोकरन्सीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी फ्रेमवर्क आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक सहकार्याची गरज आहे.
2.2047 मध्ये आयटीआर फाइल करणाऱ्यांची संख्या 48.2 कोटी असेल.
कर भरणामध्ये तीन पट वाढ झाली आहे. 2047 मध्ये आयकर दात्यांची संख्या 48.2 कोटी होईल.









