ऑनलाइन टीम / तरुण भारत :
पुण्यात काही दिवसांपूर्वीच एमपीएससी करणाऱ्या एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आज पहाटे पुण्यातील टिळक रस्त्यावर एमपीएससी करणाऱ्या एका तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपींचा माग काढत अवघ्या दोन तासात आरोपींना अटक केली. तिन्ही आरोपींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









