सांखळी नगराध्यक्षांचा इशारा : पालिकेची दोन दिवस आठवडा बाजार भरविण्याची संकल्पना
सांखळी : सांखळी नगरपालिकेने आठवड्याचा बाजार आता रविवार व सोमवार असे दोन दिवस भरविण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी रविवारी दि. 3 सप्टें. रोजी पासून करण्यात आली. आजचा पहिलाच दिवस असल्याने सांखळीतील या नवीन संकल्पनेतील बाजाराला संमिश्र्र असा प्रतिसाद लाभला. सांखळीचा बाजार ओस पडत चालला आहे. त्याला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी आराखडा करण्याची मागणी बाजारातील व्यापारी वर्गातून केली जात होती. त्यासाठी सांखळीचा आठवडा बाजार रविवारीही भरविण्याचा निर्णय साखळी नगरपालिकेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गेल्या सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी सकाळी नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, नगरसेविका दीपा जल्मी, निकिता नाईक, पालिका मार्केट निरीक्षक बसप्पा यांनी बाजारात फिरून सर्व विव्रेत्यांना रविवारी सांखळी बाजारात दुकाने थाटण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार रविवारी सकाळी सांखळी बाजारात काही भाजीविव्रेते दाखल झाले होते. परंतु कपडे, चप्पल व इतर. सामान विक्री करणारे विव्रेते बाजारात दाखल झाले नव्हते. काहीच कपडेवाले आले होते. रविवारी जर बसणार नसाल तर पुढील सोमवारीही दुकान थाटण्यास पालिका विरोध करेल, असा थेट इशाराच त्यांनी विव्रेत्यांना दिला. सांखळीचा आठवडा बाजार आता रविवार व सोमवार असे दोन दिवस भरणार असल्याचा प्रसार सर्वत्र करण्यात आला होता. सकाळी बाजार भरणार या आशेने ग्राहकांनी बाजारात बरीच गर्दी केली होती. पण भाजी विव्रेते सोडल्यास कपडे, चप्पल व इतर विव्रेत्यांनी आपली दुकानेच न थाटल्याने लोकांची निराशा झाली. संध्याकाळी 6.30 नंतर तर बहुतेक विव्रेत्यांनी आपले सामान गुंडाळले..









