चाळीस भजनी कलाकारांचा सन्मान
म्हापसा : साळगाव मतदारसंघात सर्व सहाही पंचायत क्षेत्रात विकास कामे झपाट्याने होत आहे. ही विकासाच्या दृष्टीकोनातून चांगली गोष्ट आहे. विविध प्रकल्प येणाऱ्या दिवसात पूर्णत्वाकडे येणार असून त्यात नवीन पंचायत घराचे उद्घाटन येत्या 14 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती आमदार केदार नाईक यांनी दिली. वेरे येथील श्री सरस्वती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच सुस्मिता सुभाष पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, उपसरपंच श्रुती चोडणकर, सुभाष पेडणेकर, गौरी गौरीश पेडणेकर, रजनी महादेव पऊळेकर, प्रसन्ना नागवेकर, संगिता भोसले, उमेश मयेकर, झेवियर डिसोझा उपस्थित होते. पंच सुभाष पेडणेकर यांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायत वेरे रेईश मागूस यांच्या सहकार्याने गावातील भजनी कलाकारांचा स्मृतिचिन्ह तसेच मतदारसंघातील देवस्थान व चर्चाना तबला पेटी व इतर वाद्य मोफत भेट देण्यात आले.
यावेळी मतदारसंघातील 40 भजनी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भानुदास शिरोडकर (सोनारभाट), चंद्रमोहन चोडणकर (सोनारभाट), रामदास नाईक (आंबेखंड), गोपिनाथ सरवणकर (सोनारभाट), नीलेश चोपडेकर (आंबेखंड), लक्ष्मण (बापा) गोवेकर(आंबेखंड), संजय सरवणकर (सोनारभाट), रमेश बुडकुले कामत (सोनारभाट), प्रमोद धुंगाट (तुआंत), उमेश धुंगाट(अंबेखंड), प्रशांत साळकर (आंबेखंड), विश्वंबर चोडणकर (बेतीं), शिवराम भोसले (बेतीं), गोपिचंद्र हळर्णकर (बेतीं), शिवाजी सुतार (बेतीं), नारायण तारी(बेतीं), राजेश गडकर (बेतीं), उमाकांत कवळेकर (बेतीं), अऊण पोटतीस (बेतीं), परशुराम सावंत (बेतीं), दिव्या नाईक (बेतीं), सखाराम तळकटकर (बेतीं), प्रकाश शिरोडकर (बेतीं) सर्व भजनी गायक. ऑर्गन-कोन्नी डीसोझा (आंबेखंड), वायोलीन-आंतोनियो वेल्हो (केघडीवली), वायोलीन-सुकोर्रो डीसोझा (तुआंत), घुमट- जोसेफ आफोन्सो (तुआंत), हार्मोनिअम-तोतू पोतेकर (सोनारभाट), पियानो-जो फर्नांडिस (पोरतीस), हार्मोनिअम-यशवंत माडेलकर (बेतीं). आग्नेलो क्रास्तो (तुआंत), नोहा डीसोझा (सोनारभाट), सावियो फर्नांडिस (केघडीवली), कोन्सटानसिओ डायस (तुआंत), हेनरी डिसोझा (पोतीस), प्रेजीरीस गोन्साल्वीस (आंबेखंड), आलेक्स फर्नांडिस -तुआंत (सर्व गिटारीस्ट). तबला- आनंद गुरव (बेतीं), तबला-लक्ष्मीकांत नाईक (तुआंत) यांचा समावेश आहे.
धार्मिक संस्थांमध्ये वाद्य यंत्रांचे वितरण करण्यात आले त्यात मंदिरे: श्री शांतादुर्गा नेर्लीकरीण (आंबेखंड वेरे), श्रीकृष्ण मंदिर (आंबेखंड वेरे), श्री सरस्वती मंदिर (आंबेखंड वेरे), श्री हनुमान मंदिर (सोनारभाट वेरे), श्रीकृष्ण मंदिर (मानशेर वेरे), श्री साईबाबा मंदिर (व्होलान बेतीं), श्री राम सिता मंदिर (रामनगर बेतीं), श्री पांडुरंग देवस्थान (बेतीं), थ्री किंक्स चर्च (वेरे रेईश मागूस), नोसा सेन्होरा दी रोझारिओ (पोरतीस वेरे), नोसा सेन्होरा नेसिडेड (आंबेखंड वेरे), सोसा सेन्होरा तोडा (सोनारभाट वेरे), सेंट अँथनी चॅपेल (तुआंत वेरे), आवर लेडी ऑफ रोझरी (केघडीवली वेरे) यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन वर्षा मळीक यांनी तर आभार पंच प्रसन्ना नागवेकर यांनी मानले.









