वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा फलंदाज लिटन दास बांगलादेश संघात पुन्हा दाखल झाला असून तो सुपर फोर फेरीत संघातून खेळणार आहे. त्याला ताप आल्याने तो संघासोबत लंकेत जाऊ शकला नव्हता. त्यांच्या मेडिकल टीमने त्याला फिटनेस प्रमाणपत्र दिले असल्याने तो आता सुपर फोर फेरीत खेळणार असल्याचे आयसीसीने सांगितले.
रविवारी बांगलादेशने अफगाणिस्तानवर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवून सुपर फोर फेरीमधील स्थान निश्चित केले होते. लिटन दासच्या जागी मेहदी हसन मिराझला सलामीला खेळविण्यात आले होते आणि त्याने शतकी खेळी केली. लंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात मात्र बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला होता.









