मुंबई
खासगी क्षेत्रातील बँक यस बँकेचा समभाग शेअरबाजारात गेल्या तीन सत्रात जवळपास 15 टक्के इतका तेजी राखून व्यवहार करताना दिसत आहे. मंगळवारच्या सत्रात बँकेचा समभाग 3 टक्के इतका वाढून 19.12 रुपयांवर कार्यरत होता. बँकेचे एकूण बाजार भांडवलही 55 हजार कोटी रुपयांच्या पार पोहचले आहे. सोमवारी हा समभाग जवळपास 8 टक्के वधारत 18.61 रुपयांवर बंद होण्यात यशस्वी झाला होता.









