कणकवली/प्रतिनिधी
शहरातील प्रतिथयश व्यापारी महेश रमेश कामत व सौ. रुपाली कामत यांची कन्या डॉ. सायली कामत यांनी दंत वैद्यकीय क्षेत्रातील उच्च एमडीएस या पदवी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केले आहे. यामुळे सर्व क्षेत्रातून तीचे अभिनंदन होत आहे.
डॉ. सायली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट उर्सुला हायस्कूल वरवडे येथे झाले होते. त्यांनी बीडीएस ही पदवी वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयामधून प्राप्त केले होते. तर एमडीएस पदवी तीने संगमनेर येथील एसएनबीटी मधून पूर्ण केले आहे. तीने दंतवैद्यकीय क्षेत्रातील एन्डोडॉन्टीस, रुट कॅनल स्पेशालीस्ट या विषयात विशेष प्राविण्य मिळविले आहे.
डॉ. सायली ही शहरातील प्रतिथयश व्यापारी रमेश कामत, सुरेश कामत तसेच सामाजिक कार्यकर्ते कै. अपीशेठ गवाणकर यांची नात आहे









