वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बुमराहने स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो पोस्ट केला आहे. बुमराहची पत्नी संजनाने सोमवारी (4 सप्टेंबर) मुलाला जन्म दिला आणि याच कारणास्तव बुमराहने आशिया चषक स्पर्धेतून मायदेशी परतला होता. मात्र पुन्हा तो आशिया कप स्पर्धेतील सुपर-4 साठी भारतीय संघात पुन्हा सामील होणार आहे. बुमराह आणि संजनाने त्यांच्या मुलाचे नाव अंगद जसप्रीत बुमराह असे ठेवले आहे. ‘आमचे छोटे कुटुंब थोडे मोठे झाले आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही आमच्या कुटुंबात आमच्या मुलाचे स्वागत केले’ अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली आहे.









