काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी मोदी सरकारवर ‘वन नेशन वन इलेक्शन’ या निर्णयावर हल्ला चढवून सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करून देशाला ‘हुकूमशाही राष्ट्रा’मध्ये बदलण्याच्या तयारीत असल्याची टिका केली.आपल्या ट्विटरवर अकाउंटवर त्यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी लिहीताना ते म्हणाले, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर समिती स्थापन करण्याची ही नौटंकी म्हणजे भारताची संघराज्य रचना मोडून काढण्याचा प्रयत्न आहे. यासाठी भारतीय राज्यघटनेत किमान पाच दुरुस्त्या आवश्यक असून ती लोकप्रतिनिधी कायदा- 1951मध्येही मोठ्या प्रमाणात बदल करावे लागणार आहेत. निवडून आलेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या अटी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरही घटनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.
या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित करताना खरगे म्हणाले, “यापूर्वीच अशा प्रकारच्या निर्णयाची व्यापक तपासणी तीन समित्यांमार्फत केली गेली असून ती नाकारली सुद्धा गेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता असा मोठा निर्णय एकतर्फी का घेतला जात आहे?” काँग्रेस नेत्याने आश्चर्य व्यक्त करताना 2024 साठी, भारतातील लोकांकडे फक्त एक राष्ट्र, एक उपाय आहे तो म्हणजे भाजपच्या कुशासनापासून मुक्त होणे!”









