उमदी,वार्ताहर
Sangli Crime News : जत तालुक्यातील सोन्याळ येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून 1540 रू मुद्देमालासह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोन्याळ गावी सदाशिव श्रीशैल ऐवळे हा आपल्या घरामागील पडक्या जागेत अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून संत्रा कंपनीचे देशी दारूसह आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर दारूबंदी कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सपोनी संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिसांनी केली आहे.








