उपअभियंत्याना धरले धारेवर
न्हावेली / वार्ताहर
गावातील एका कुटुंबाला नवीन मीटर कनेक्शन मंजूर होऊन व त्याची पूर्ण रक्कम भरून सुद्धा मीटर कनेक्शन जोडण्यासाठी वायरमन यांच्याकडून टाळा -टाळ केल्याने न्हावेली येथील युवा कार्यकर्त्याने आज महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयावर धडक मोर्चा नेत उपअभियंता यांना धारेवर धरले. यावेळी कार्यकर्त्यांनी उपअभियंताना समजावत घडलेला सर्व विषय सांगितला व अशीही समजूत दिली की, यावेळी समजुतीच्या भाषेने आलोय पुढच्यावेळी असा त्रास न्हावेली गावातील ग्रामस्थांना झाल्यास भूमिका वेगळी असेल व त्याला सर्वस्वी जबाबदार महावितरण व तुमचे कर्मचारी असतील.त्यानंतर उपअभियंता यांनी विषय समजून घेऊन तात्काळ त्याची दखल घेत एका तासाच्या आत नवीन मीटर कनेक्शन जोडून देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर,प्रसाद गावडे,समीर पार्सेकर , गजा दळवी,सावळाराम न्हावेलकर, ओंकार निर्गुण,अंकित घोगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्या कुटुंबाने कार्यकर्त्यांचे आभार मानले.









