प्रतिनिधी/ बेळगाव
गणेश फेस्टिव्हलचे शनिवारी रांगोळी स्पर्धेने उद्घाटन करण्यात आले. शास्त्राrनगर येथील ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेत श्री राजमाता सोसायटीच्या चेअरमन मनोरमा देसाई, भक्ती सोसायटीच्या चेअरमन ज्योती अगरवाल, डॉ. निना पाटील, रूपाली जनाज, प्रतिभा नेगिनहाळ, स्मिता आर्य, भक्ती देसाई, प्राचार्या अलका साठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ज्योती अगरवाल यांनी सर्वांचे स्वागत केले. अलका जाधव यांनी स्पर्धांची माहिती दिली. प्रतिभा नेगिनहाळ यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर फ्री हँड रांगोळी स्पर्धा पार पडली.









