हुपरी,वार्ताहर
Jalna Lathi Charge : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज करत अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांचा व शासनाचा हुपरीतील मराठा क्रांती व मराठा समाजाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ जुने एस.टी.स्टॅन्ड येथे मोठ्या संख्येने उपस्थिती राहून जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी मराठा क्रांतीचे विनायक विभुते,पृथ्वीराज गायकवाड,मराठा समाज अध्यक्ष रविशंकर चिटणीस,उपाध्यक्ष सजंय निकम प्रतापसिंह देसाई नेताजी निकम,सचिन जाधव,सत्ताप्पा गायकवाड,संजय वाईंगडे,अमोल देशपांडे,सुनील सांगवडे,अजीत ऊगळे,पांडुरंग पवार,गोलु मेथे ,संभाजी हांडे, प्रशांत उर्फ गोट्या पाटील,राष्ट्रवादीचे बाहुबली गाठ,रवि नाईक,तुषार मालवेकर सुरज कदम,रणजित वाईंगडे,सूर्यकांत रावण,गणेश वाईंगडे, प्रतिकराज निंबाळकर अमर माने,नागेश कौंदाडे,प्रताप भोसले विशाल चव्हाण उपस्थितीत होते.