सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वेधले मुंबई विद्यापीठाचे लक्ष
मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्तर पत्रिका हे ऑनलाईन पद्धतीने तपासले जात असल्याने पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्याचे नुकसान सहन करावे लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे निकाल हे अर्धवट (आर आर) दाखवत आहेत तर अनेक विद्यार्थी हे हुशार असूनही त्या त्या विषयात नापास झालेल्या निदर्शनास आले आहेत.यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मनोबळ खचलेले असल्याने विद्यार्थ्यांच्या आता शिक्षणावर विश्वास राहिलेला नाही. मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेले वार्षिक परिक्षांचे निकालांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे निकाल हे अर्धवट लागल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला धाव घ्यावी लागत आहे.
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेले निकालांमध्ये अर्धवट निकाल व चुकीचा निकाल जाहीर केल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व नोकरी पासून वंचित राहावे लागत आहे विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना विचारले असता विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांकडून आज या उद्या या असे प्रश्नांची उत्तरे मिळत आहे विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी व पुनर तपासणी साठी अर्ज केल्यानंतर रिव्होल्युशनचे रिझल्ट अजूनही लागत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली तसेच उत्तर पत्रिका फोटोकॉपी तर उत्तर पत्रिकांची पाने गायब असुन काही प्रश्न तपासलेले नाहीत .मग त्या कंपनीला पैसे का दिले जातात असा प्रश्न तयार झालेला आहे .मुलांची उत्तर पत्रिका देखील अर्धवट तपासणाऱ्या शिकक्षकाना मानधन मात्र पुर्ण दिले जात आहे एखादा विद्यार्थी जर कोणाताही अर्ज उशीराने करत असल्यास त्याला दंड लावण्यात येतो मग विद्यापीठाने VC ॲकट नुसार निकाल न लावता तसेच अनेक विद्यार्थ्यांचे अर्धवट निकाल जाहिर करुन व हुशार मुलांना नपास करुन एक विश्वविक्रम केला आहे . महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री आशिष सुभेदार यांनी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा संचालक हे जिल्ह्यातील मुलांच्या नुकसानीसाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नुकसानाकरिता त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.