फक्त शेतकरी कुळातच नव्हे हालगा-मच्छे बायपास लढ्यात या मुलीसह संबध कुटूंबाने झोकून देत समिधाच्या आईने आपली शेती कदापी देणार नाही म्हणून पोलिस फौजफाट्यासह आलेले शासकीय अधिकारी,महामार्ग ठेकेदारसह येऊन त्यांच्या उभ्या पिकात जेसीबी घालतानां पाहून खवळलेल्या कुटुंबासह समीधासह तिच्या आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना महिला पोलिसांनी अटक केली आणी त्याच लढ्याला आज यश आलय.त्याच कुटुंबातील समिधा बालिका आदर्श शाळेत सहावीत शिकत कुस्तिचेही धडे घेत असतानां तिने ३० किलो वजन गटात उत्तूंग खेळ करत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आता तिचि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याने रयत गल्लीतील शेतकरी व इतर नागरिकांत समाधान व्यक्त होत पुढील वाटचालिस भरभरुन शुभेच्छा दिल्या जात आहेत. समीधाला शाळेचे शारिरीक कवायत शिक्षकांसह इतर प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.रयत गल्लीला परंपरागत व्यायाम आणी कुस्तीची आवड असल्याने शरीरसौष्ठव,कुस्ती, करेला स्पर्धा, वेटलिफ्टिंग,गाडी ओढण्याच्या शर्यतीबरोबर अनेक स्पर्धेतून आपली कर्तबगारी दाखवत स्थानि,जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच देशपातळीवरही येथील स्पर्धेत रयत गल्लीचा ठसा उमटत असल्याने समिधा येवढ्या लहान वयात कुस्ती स्पर्धेत महिला गटात प्रथमच येवढे यश मीळवल्याने प्रत्येकाला अभिमान वाटत बहुसंख्य शेतकरी असलेल्या रयत गल्लीतील प्रत्येकजन तिच्या पुढील यशाची वाट पहात आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









