विज ग्राहक संघटना पदाधिकारी व महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांची उपस्थिती
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली व आंबोली विज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या विज ग्राहकांच्या वीज संबंधित समस्या निवारण्यासाठी रविवार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ३ वाजता दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिरात विज ग्राहक, विज ग्राहक संघटना पदाधिकारी आणि विज वितरणचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन महावितरण कंपनी कडून त्यांचे निवारण करण्यासाठी विज ग्राहक संघटना कार्यरत असून त्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सावंतवाडडी तालुका विज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, विज महावितरणच्या दोन्ही उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता श्री. चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
सांगेली व आंबोली वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील ग्राहकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी व सचिव संजय नाईक, समन्वयक बाळ बोर्डेकर यांनी केले आहे.









