नवी दिल्ली :
कांच निर्मितीतील दिग्गज कंपनी सेंट गोबेन भारतात आगामी काळात जवळपास 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीने 10 टक्के इतका विकास साधण्याचे उद्दिष्टही समोर ठेवले आहे. भांडवल खर्च व अधिग्रहणासाठी कंपनी वरील रक्कम आगामी 4 ते 5 वर्षात खर्च करणार असल्याचे समजते. अलीकडेच कंपनीने रॉकवुल इंडिया आणि ट्वीगा यांचे अधिग्रहण केले आहे.









