शिवबसवनगर येथील घटनेनंतर काहीकाळ तणाव
बेळगाव : दगडाने ठेचून युवकाचा खून करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा शिवबसवनगर येथे घडलेल्या या घटनेनंतर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. एका टोळक्याने तऊणाचा पाठलाग करीत दगडाने ठेचून त्याचा खून करून तेथून पलायन केले आहे. रात्री या घटनेची माहिती माळमाऊतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिरची व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल झाले त्यावेळी युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खून झालेला युवक त्याच परिसरातील असल्याची माहिती मिळाली. नागराज ईराप्पा गाडीवड्डर (वय 26, रा. वड्डरवाडी) असे त्याचे नाव असून नागराजचा खून कोणी व कशासाठी केला, याचा रात्री उशीरापर्यंत तपास सुरू होता. नागराजचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुऊ होती.









