खानापूर म. ए. समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्मयात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, या मागणीचे निवेदन खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे खानापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठवून देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्मयातील अनेक लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. यावषी पिकांना हवा तेवढा पाऊस झाला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे.
कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे पिके सुकून गेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने इतर तालुक्मयांप्रमाणेच खानापूर तालुक्मयातील नुकसानग्रस्त पिकांचे संबंधित खातेनिहाय सर्वेक्षण करावे. ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीचा तपशील वरिष्ठांपर्यंत पाठवावा, खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे नेते मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, मऱ्याप्पा पाटील, डी. एम. भोसले, गोपाळ पाटील, राजाराम देसाई आदींसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून देणार असल्याचे आश्वासन दिले.









