मुंबई
महिंद्र लाइफस्पेसचा समभाग शेअरबाजारात बुधवारी नव्या उच्चांकी भावावर पोहचला होता. बुधवारी रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 9.5 टक्के वाढत 587 रुपयांवर पोहचला होता. हा समभागाचा उच्चांकी भाव मानला जात आहे. याआधी 550 रुपयांवर सप्टेंबर 2022 मध्ये समभागाने झेप घेतली होती. नाइट फ्रँक इंडिया व नॅरडको यांनी कंपनीची वाटचाल यशदायी राहणार असल्याचे म्हटले आहे. त्याचाच परिणाम समभागावर बुधवारच्या सत्रात पहायला मिळाला.









