पंढरपूर प्रतिनीधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवत पंढरपूर व मोहोळ विधानसभा मतदार संघातील उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटास मोठे खिंडार पडले आहे.
मंगळवारी रात्री मुंबई येथील वर्षा बंगलयावर हे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे आणि जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उद्योजक राजु खरे, चरणराज चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करून सर्व शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा जयजयकार केला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, पक्ष प्रतोद आणि महाडचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ऊर्जितावस्था आणली असून येथील शिवसेनेला मोठी भरती आल्याचे दिसू लागले आहे.
या झालेल्या प्रवेशामध्ये उद्धव ठाकरे सेनेचे उप जिल्हा प्रमुख दादाराव पवार, माजी जि . प सदस्य दादासाहेब कर्णवर, कामगार सेनेचे प महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता विटकर, नरखेड गटाचे विभाग प्रमुख समाधान खंदारे, कुरुलचे गट प्रमुख नितीन बचुटे, मसले चौधरी विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, अर्जुंसोंडचे गट प्रमुख अमोल पाटील, दादपुरचे शाखा प्रमुख शंकर कपने, कामतीचे शाखा प्रमुख समाधान भोसले, दादपुरचे उपशाखा प्रमुख भैय्या अवताडे, बोपले गावचे माजी सरपंच विलास ढेरे, महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संघटनेचे अध्यक्ष हरिष शिंदे, आदीसह शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे पंढरपूर – मोहोळ मतदार संघातील शिंदे गटाला मोठ बळ मिळाले आहे.
आता तयारीला लागा..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहोळ विधानसभा मतदार संघातील सुमारे २५०पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशानंतर उद्योजक राजू खरे यांच्या पाठीवर थाप मारीत मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी संवाद साधताना, यावेळी मोहोळ मतदार संघातील राजकीय परिस्थितीवर चर्चाही झाली.२०२४च्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्योजक राजू खरे यांनी तयारीला लागावे असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.यामुळे सेनेतून निवडणूक लढविण्यास मागील निवडणुकीपासून इच्छुक असलेले राजू खरे यांचा मार्ग हायकमांडनेच मोकळा केला आहे.









