हीनेकेनने रशियातील व्यवसाय विकला : जगातील दुसरी सर्वात मोठी मद्य निर्मिती कंपनी
नवी दिल्ली
हीनेकेनने रशियातील आपला व्यवसाय विकला आहे, जगातील दुसरी सर्वात मोठी मद्य उत्पादक कंपनी बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. हीनेकेन रशियामधील आपले कामकाज बंद करत आहे. यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीने रशियातील आपला करोडोंचा व्यवसाय केवळ 90 रुपयांना विकला. या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला. हीनेकेनने आपला संपूर्ण व्यवसाय अर्न्स्ट ग्रुपला 1 युरोमध्ये विकला.
हीनेकेनचे साम्राज्य
रशियामधील हीनेकेन कंपनीचे मूल्य सुमारे 300 दशलक्ष युरो आहे. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे 26 अब्ज 80 कोटी रुपये आहे. या निर्णयानंतर सर्वजण विचारत आहेत की एवढी मोठी कंपनी केवळ एक युरोला का विकली गेली? या बाबत तर्कविर्तक सुरु आहेत.
एवढ्या कमी किमतीत हीनेकेन विकण्यामागचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध म्हटले जात आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून कंपनी विकण्याचा प्रयत्न सुरु होता. कंपनी केवळ एक युरोसाठी प्रतिकात्मकपणे विकली गेली आहे. जेणेकरून रशियातून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि हीनेकेन कोणत्याही कायदेशीर अडथळ्यांशिवाय तेथून बाहेर पडू शकेल.
युद्धामुळे नुकसान
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे प्रचंड नुकसान होऊनही कंपनीची विक्री केली जात आहे. कंपनीचे सीईओ डॉल्फ व्हॅन डेन ब्रिंक यांच्या मते, कंपनीमध्ये सध्या 1,800 कर्मचारी आहेत. ज्यांना पुढील तीन वर्षे रोजगाराची हमी दिली जाईल. सध्या रशियाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. युद्धामुळे केवळ हीनेकेनच नव्हे तर इतर कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. एकामागून एक, मोठ्या कंपन्या रशिया सोडत आहेत.









