लखनौ :
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी शिस्तभंगाचा आरोप करत इम्रान मसूद यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. इम्रान मसूद यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात बसपमध्ये प्रवेश केला होता. मायावती यांनी मसूद यांना पश्चिम उत्तरप्रदेशात बसपच्या समन्वयकपदी नियुक्त केले होते. इम्रान मसूद हे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात आहे. इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती.









