सोशल मीडियावर प्राणी, पक्ष्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओंमध्ये प्राणी तसेच पक्षी हे अनेक कौशल्यं दाखवून अनेकांना थक्क करून सोडत असतात. पोपटाला माणसांची नक्कल करताना तुम्ही पाहिले असेल, तसेच शिट्टी मारताना ऐकले असेल. पण तुम्ही कधी पोपटाला सायकल चालवता, स्केटिंग करताना पाहिले आहे का? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत हा अजब प्रकार दिसून आला आहे. एक पोपट रस्त्यावर स्वत:चे अनोखे कौशल्य दाखविताना दिसून आला आहे.

या व्हिडिओत रस्त्यावर असलेली एक सायकल लाल रंगाचा पोपट चालविताना दिसून येतो. त्याचे इवलेसे पाय सायकलच्या पॅडलवर पडत असल्याचे आणि काही अंतर गेल्यावर तो स्केटिंग करताना दिसून येते. पोपटांचे हे कौशल्य पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण कॉमेंटमध्ये पोपटाचे कौतुक करत आहेत.









