दुहेरीत अथर्व हुबळीकर व सिध्दांत दुहेरीत विजेते
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित निमंत्रितांच्या बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव बॅडमिंटन संघटनेचे खेळाडू हेलिक्स सिंग एकेरीत विजेतेपद व दुहेरी अर्थव सिध्दांत यानी हेलिक्स व सुजय या जोडीचा पराभव करून दुहेरी विजेतेपद पटकाविले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित शटल बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या बॅडमिंटनपटूंनी भाग घेऊन यश संपादन केले. पुरूषांच्या एकेरी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सुजयने अर्थवचा 30-28 अशा गुण फरकाने तर हेलिक्सने ओंम एलिगारचा 30-26 असा पराभव करून उपांत्यफेरी गाठली. उपांत्यफेरीत सुजयने ऐश्वर्याचा 5-2 असे गुण असताना ऐश्वर्याला दुखापत झाल्याने सुजयला पुढेचाल देण्यात आले तर हिलेक्सने सिध्दांत अप्पुगोळचा 21-18, 19-21, असा पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात हेलिक्सने सुजयचा 21-15, 21-14 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. दुहेरीत उपांत्य फेरीत सुजय व हेलिक्स या जोडीने माहिम व वृषंकचा या जोडीचा 21-14, 24-22 अशा गेम्समध्ये तर दुसऱ्या उपांत्य फेरीत अर्थव व सिध्दांत या जोडीने महम्मद झाकी व अखिलेश या जोडीला 21-14, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत अर्थव व सिध्दांत या जोडीने सुजय हिलेक्स या जोडीचा 21-18, 15-21, 21-19 असा पराभव केला. अर्थव हुबळीकर व सुजय नंदण्णावर या तिघांना प्रशिक्षक भूषण अणवेकर, व अशोक पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.









