जयसिंगपूर प्रतिनिधी
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव टोल नाक्यावर सापळा रचून सोमवारी दुपारी बोलोरो पिक अप गाडीतून कर्नाटकातून जयसिंगपूर मार्गे बारामतीकडे जात असलेला हिरा कंपनीचा पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा असा अठरा लाख रुपये किमतीचा गुटखा व दहा लाख रुपये किमतीची बोलोरो पिक अप मालवाहतूक गाडी असा 28 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी संजय धोंडीराम माने 47 राहणार कोरोची तालुका हातकलंगडे व राकेश रवींद्र मोरे ३० राहणार जांभळी तालुका शिरोळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रमोद वाघ अमित देशमुख पोलीस नाईक मुजावर पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे अमोल अवघडे आदींनी केले









