पुणे / प्रतिनिधी :
राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (२८ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेतली. अतिवृष्टीमुळे तीन परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा घ्यावी लागली. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. http://www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल.