मालवण | प्रतिनिधी
नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून मालवण बंदर जेटी येथे बुधवार ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हास्तरीय महिला व पुरुष संघांची कबड्डी स्पर्धा लायन्स क्लब मालवण, मालवण व्यापारी संघ व एकता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
पुरुष गटात एकूण बारा संघ सहभागी होणार असून चार स्थानिक व आठ निमंत्रित संघांचा समावेश असणार आहे. विजेत्या संघास ११,१११ व चषक (उमेश नेरुरकर पुरस्कृत), उपविजेता ६,६६६ व चषक (मुकेश बावकर पुरस्कृत) तसेच तृतीय व चतुर्थ संघास प्रत्येकी दीड हजार व चषक महेश गिरकर यांच्या स्मरणार्थ.
महिला गटात आठ संघ सहभागी होणार असून तीन स्थानिक व पाच निमंत्रित संघांचा यात समावेश असणार आहे. महिला गटातील विजेत्या संघास ३,३३३ व चषक(वैशाली शंकरदास पुरस्कृत), उपविजेत्या संघास २,२२२ व चषक (विश्वास गांवकर पुरस्कृत) यासह दोन्ही गटात उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट खेळाडू यांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.









