जगात प्रत्येक देश सर्वसाधारणपणे ‘पुरुषप्रधान’ आहे. महिलांना कितीही आणि कोणतेही अधिकार देण्यात आलेले असले तरी बहुतेक कार्यक्षेत्रांमध्ये संख्या आणि वर्चस्व पुरुषांचेच दिसून येते. याला जशी परंपरा कारणीभूत आहे, तशी पुरुष आणि महिला यांची मानसिकताही कारणीभूत आहे. तथापि, या पृथ्वीच्या पाठीवर एक देश असा आहे की, जेथे पुरुष अनोख्या रितीने महिलांची ‘सेवा’ करतात.
या देशात महिलांनी पुरुषांना अक्षरश: गुलाम बनविले आहे. त्यांना काहीवेळा जनावरांसारखी वागणूक दिली जाते. घरोघरी पुरुषांना महिलांची सँडल्स आदि पादत्राणे आपल्या जीभेने चाटून स्वच्छ करावी लागतात. पुरुषही अशी अवमानजनक कामे मुकाट्याने करतात. हा देश जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणाऱ्या युरोपमधील आहे. त्याचे नाव ‘अदर वर्ल्ड किंग्डम’ असे आहे. 1996 मध्ये झेकोस्लाव्हाकिया या देशापासून अलग होऊन हा देश निर्माण झाला आहे. या देशात स्त्रियांचे राज्य आहे. पेट्रिशिया असे या देशाच्या महाराज्ञींचे नाव असून त्यांच्या हाती देशाचे पूर्ण आणि सर्व अधिकार आहेत. येथे पुरुषांवर इतका अन्याय होतो की त्यांना देशाचे नागरिकत्वही दिले जात नाही. नागरिकत्वाच्या अधिकारी केवळ महिला आहेत. एखाद्या पुरुषाला नागरिकत्व हवे असेलच तर त्याला महाराज्ञींच्या पदरी पाच दिवस गुलाम म्हणून राबावे लागते. पुरुषाला मद्यप्राशन करावेसे वाटले तर आधी त्या मद्याचा नैवेद्य महाराज्ञींना दाखवावा लागतो. त्यांनी ते चाखून पाहून मान्यता दिली तरच त्याला त्याचे प्राशन करता येते.
या देशात महिलांसाठीही काही नियम आहेत. प्रत्येक नागरीक महिलेपाशी एक तरी पुरुष गुलाम किंवा नोकर असला पाहिजे हा प्रमुख नियम आहे. याशिवाय महिलांनाही महाराज्ञींच्या राजप्रासादात पाच दिवस काम करावे लागते. अर्थात हा देश अत्यंत लहान आहे त्याचे क्षेत्रफळ अवघे साडेसात एकरचे आहे. मात्र, येथे काही इमारती, जलतरण तलाव आणि इतर सोयी मात्र अमूप आहेत.









