25 आमदारांना मिळाली घसघशीत रक्कम
पणजी : विधानसभा अधिवेशन काळात आमदारांना भत्ता, निवास भत्ता आणि प्रवास खर्च हा अतिरिक्त स्वऊपात दिला जातो. त्यामुळे यंदा झालेल्या 18 दिवसीय पावसाळी अधिवेशनात हजेरी लावलेल्या सुमारे 25 आमदार मालामाल बनले आहेत. परंतु 15 लोकप्रतिनिधींना मात्र नियमानुसार याचा लाभ मिळालेला नाही. 18 जुलै ते 10 ऑगस्ट या दरम्यान पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात 25 आमदारांपैकी 20 आमदार सर्व दिवस उपस्थित राहिल्याने त्यांना संपूर्ण लाभ मिळाला आहे. पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. देविया राणे ह्या सहा दिवस अधिवेशन काळात हजर राहू न शकल्याने त्यांना सर्वाधिक कमी रक्कम मिळाली आहे. आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड व कार्लुस फेरेरा हे प्रत्येकी एक दिवस अनुपस्थित राहिले. उर्वरित 20 आमदार सर्व दिवस हजर राहिल्याने त्यांना सर्वाधिक आर्थिक लाभ झाला. अधिवेशनास हजर राहणाऱ्या आमदारांना प्रत्येक दिवशी दोन हजार ऊपये भत्ता, तीन हजार ऊपये निवास भत्ता आणि एक हजार ऊपये प्रवास खर्च दिला गेला. देण्यात आलेल्या भत्याप्रमाणे सर्व दिवस हजर असलेल्या 20 आमदारांना प्रत्येकी 18 दिवसांसाठी 1.08 हजार ऊपये याप्रमाणे 21.60 लाख ऊपये अधिवेशन काळात भत्यांच्या स्वऊपात देण्यात आले आहेत. आमदार देविया राणे सहा दिवस अनुपस्थित राहिल्याने त्यांना 12 दिवसांचे 72 हजार ऊपये देण्यात आले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड, दिगंबर कामत, कार्लुस फेरेरा, आणि आलेक्स सिक्वेरा प्रत्येकी एक दिवस गैरहजर राहिले. त्यामुळे या चार आमदारांना 17 दिवसांचे एकूण 1.02 लाख ऊपये देण्यात आले आहेत.
यांना मिळत नाही मानधन…
सभापती, उपसभापती, मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना विधानसभा काळातील मानधन नियमानुसार देता येत नाही. त्यामुळे सभापती, उपसभापती, बारा मंत्री आणि विरोधी पक्षनेते अशा 15 आमदारांना अधिवेशन काळातील मानधनाचा लाभ घेता आला नाही.








