प्रसिद्ध शेफ आता अभिनयाच्या क्षेत्रात
प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने यापूर्वीच अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मॉडर्न लव्ह : मुंबई या सीरिजमधील त्याचा अभिनय लोकांना पसंत पडला होता. रणवीर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. हंसल मेहता आणि एकता कपूर यांच्या आगामी मर्डर मिस्ट्रीमध्ये रणवीर झळकणार आहे. यात त्याची जोडी करिना कपूरसोबत जमणार आहे. अशाप्रकारच्या प्रोजेक्टमध्ये स्वत:ला आजमाविण्याची संधी मिळते.

या चित्रपटातील व्यक्तिरेखेने अत्यंत आकर्षित केले होते. ही व्यक्तिरेखा काहीशी नकारात्मक छटा दर्शविणारी असल्याचे रणवीरने म्हटले आहे. हंसल मेहता यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने स्वत:ला सुदैवी मानतो. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विशेष होता. ते कलाकारांना व्यक्तिरेखा अधिक चांगल्याप्रकारे समजावून घेण्याचे आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देतात. अभिनयाच्या क्षेत्रात उतरलो तरीही कुकिंग हेच सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र आहे. मी नेहमीच शेफ राहणार असल्याचे रणवीरने म्हटले आहे.









