नवी दिल्ली
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी ओला इलेक्ट्रिकच्या अडचणीत भर पडली आहे. आगामी काळात आयपीओ सादरीकरण होणार असून त्यापूर्वीच 2 अधिकाऱ्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. स्लोकार्थ दाश (मुख्य, योजना व धोरण) व सौरभ शारदा (मुख्य, भागीदार व कॉर्पोरेट अफेयर्स विभाग) यांनी राजीनामा देत कंपनीला रामराम केला आहे. दोघांनी कंपनीत 7 वर्षे अमुल्य असे योगदान दिले आहे.









