पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि पक्षात फुट पडलेली नाही’, या विधानाकडे मी उलट्या अर्थाने बघतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्तांसोबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर म्हणाले. शरद पवार यांच्या विधानाबाबत त्यांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत अधिकचे भाष्य करण्याचे टाळले.
शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले होते. महापालिका अधिकाऱ्यांसोबत तब्बल तीन तास बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि पक्षात फुट पडलेली नाही, अस वक्तव्य केले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ‘नो-कमेंट्स’ म्हणत बोलणे टाळले. पत्रकारांना उलट प्रश्न करत तू पवार साहेबांच्या विधानाकडे कसा बघतोस असे म्हणत मी विधानाच्या उलट बघतो असे म्हणत अधिकचे बोलणे टाळले.