कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणालीमुळे उत्पादनात वाढ शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात राबविण्यात आलेला क्षारपडमुक्त प्रयोग यशस्वी झाला आहे. क्षारपडयुक्त जमीन पिकाऊ बनल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात उपयुक्त ठरत असलेला श्रीदत्त क्षारपडमुक्त पॅटर्नला केंद्र शासनाने कॉपी राईट (पेटंट) मान्यता प्राप्त दिली असल्याची माहिती श्रीदत्त कारखान्याचे अध्यक्ष क्षारपडमुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली.
शिरोळ तालुक्यात आती पाण्याचा व रासायनिक खतांच्या वापरामुळे किमान 25 हजार एकर जमीन क्षारपड बनली आहे. गेल्या आठ वर्षापासून क्षारपड जमीन मुक्तीसाठी प्रयत्न केले. शेडशाळ बुबनाळ आलास भागातील क्षारपड जमीन धारक शेतकऱ्यांची संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत क्षारपड जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला त्यात यश आले. श्री दत्त कारखान्याच्या वतीने आधुनिक पद्धतीने कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली व बंदिस्त मुख्य पाईपलाईन करण्यात आली. या जमिनी क्षार मुक्त होऊन चांगल्या प्रकारचे उत्पादन होत आहे. प्रयोग यशस्वी झाला आहे. तालुक्यात अनेक गावात हा प्रकल्प राबवल्यामुळे केंद्र शासनाने कॉपीराईट (पेटंट)अधिकार प्राप्त झाले आहे. गणपतराव पाटील यांनी सांगून ते म्हणाले की देशातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या नापिक जमिनी सुपीक करण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील राज्य व केंद्र शासनाने ही शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारमुक्त करण्यासाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा सचिव अशोकराव शिंदे जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादासो काळे मुंबईचे उद्योगपती मयूरभाई नाचरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









