ऑगस्टची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
अन्नभाग्य योजनेंतर्गत 8 लाख 29 हजार 1 अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारक कुटुंबातील 28 लाख 14 हजार 882 लाभाथीर्नां नियमानुसार डीबीटीच्या माध्यमातून अतिरिक्त तांदळाची रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
जुलै-2023 पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यापैकी 5 किलो तांदूळ व 5 किलो तांदळाच्या बदल्यात त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या योजनेला चालना देण्यात आली आहे. जुलै 2023 मध्ये 46 कोटी 54 लाख 18 हजार 520 रुपये लाभाथ्यर्च्यां बँक खात्यात जमा केले आहेत. ऑगस्ट-2023 साठी 8 लाख 97 हजार 747 कार्डधारकांच्या कुटुंबातील 30 लाख 73 हजार 726 लाभाथीर्च्यां बँक खात्यात 50 कोटी 67 लाख 49 हजार 260 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार व मोबाईल क्रमांक (ई-केवायसी) जोडलेले असावे, बँक खाते सक्रिय असावे, गेल्या तीन महिन्यांत लाभार्थीने एकदा तरी रेशन घेतलेले असावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.









