केंद्रीय गृहमंत्रालय द्विसदस्यीय समितीकडून पोलीस स्टेशनच्या कामाबद्दल केले समाधान व्यक्त
वेंगुर्ले (वार्ताहर)-
भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालय, यांचेकडील निर्देशाप्रमाणे देशांतर्गत १० उत्कृष्ट पोलीस ठाणे निवड सर्व्हे अंतर्गत दि. २३ ऑगस्ट रोजी द्वि सदस्यीय समितीने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भेट दिली. बेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गतच्या १५४ मुद्दयानुसार वेंगुर्ले पोलीस स्टेशनने केलेल्या कामाची पहाणी केली. सदर पाहणी अंती वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी सदर समितीने पोलीस स्टेशनअंतर्गतच्या कामांची माहिती व कामांच्या पुर्ततेची पहाणीही यावेळी केली.सदर समिती सदस्य यांनी उत्कृष्ट पोलीस ठाणे निवड अंतर्गत निश्चीत केलेल्या १५४ मुद्यांप्रमाणे परिसर स्वच्छता, कामकाज. पोलीस स्टेनशचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन पाहणी केली. यात पोलीस स्टेशन प्रवेशवदारापासून परीसरांत स्वच्छता. आवारात फुलझाडे व शोभिवंत झाड्यांच्या माध्यमातून प्रसन्न वातावरण निर्मीती, पोलीस स्टेशनचे नाव ठळक दिसणारे फलक तसेच भित्ती चित्रांच्या माध्यमातून ऑनलाईन होणाऱ्या गुन्ह्यांबाबत जनजागृती, पोलीस स्टेशनच्या बाहेरील व्हरांड्यात नागरिकांना थांबण्यासाठी जाना, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी पाण्यात वापरांत येणारी हवेची बोट व पाण्यातील अपघातात अपघातग्रस्थांना वाचविण्यासाठी वापरण्यात येणारी गोलाकार बचाव बोया, पोलीस निरीक्षक कक्ष व त्यातील सर्व गुन्ह्यांची अपडेट केलेली माहिती कोष्टक, ठाणे अंमलदार व तेथे तक्रार द्यावयांस येणाऱ्या तक्रारदारांस बसण्यास व्यवस्था, पोलीस कंट्रोल रूम, पोलीस कस्टडी व कोषगार सिक्युरीटी रूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा कक्ष व मिटींगसाठी स्वतंत्र हॉल यासह अन्य पोलीस ठाणेकडून १५४ मुद्यांची पूर्तता करण्यात आलेली होती. याची पहाणी या द्विसदस्यीय समितीने केली.
तसेच यावेळी वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, सुरेश पाटील, रंजिता चौहान, मनोज परुळेकर, अमर कांडर, परशुराम सावंत, उभादांडा ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश चमणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. परुळेकर, पोलिस पाटील विजय नार्वेकर, स्थानिक मच्छीमार बांधव यांचेशी या व्दीसदस्यीय समितीने पोलीस स्टेशनच्या कामाची माहिती घेतली. तसेच या समितीने तसेच या समितीने उभादांडा श्री सागरेश्वर समुद्र किनारी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला.वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन टापटिप ठेवण्याच्या कामकाजाबाबत समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.









