एका चार्जवर होणार 140 किमीचा प्रवास
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दुचाकी निर्मितीमधील भारतीय कंपनी टीव्हीएस मोटारने टीव्हीएस एक्स ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केली आहे. सदरची दुचाकी ही लाईव्ह लोकेशन शेअरिंग फिचर्ससोबत येणारी पहिली दुचाकी राहणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. कंपनीने या दुचाकीची एक्स शारुम किंमत ही 2.50 लाख रुपये ठेवली असल्याची माहिती आहे. यासोबतच देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर राहणार असल्याचेही म्हटले आहे. टीव्हीएस एक्सचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. यामुळे खरेदीदार हे 16, 275 रुपयांच्या टोकनवर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन या गाडीचे बुकिंग करु शकणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तर याची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या अखेरपासून 15 शहरांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात सुरु होणार आहे.









