Raju Shetti News : यंदा पाऊसमान कमी झाल्याने ऊस उत्पादनवर परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठत साखरसाठा कमी झाल्याने सरकारने घाई गडबडीने ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केली. 2021-22 ची 300 रुपयांची देय अजून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यंदा शेतकऱ्यांना अंतिम बिलाला 400 रुपये मिळाले पाहिजे. हंगाम सुरु होईपर्यंत सर्व कारखान्यांनी डिजिटल वजन काटे बसवले पाहिजेत. दसऱ्यापर्यंत ही शिल्लक देय द्यावी, अन्यथा हंगाम सुरु करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.तसेच यासर्व मागणीसाठी 13 सप्टेंबर रोजी प्रादेशिक साखर कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचाही माहिती दिली. आज सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यंदाच्या साखर हंगामावर ही बैठक पार पडली. या बैठकित ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, रासायनिक खतांच्या किंमती 22 टक्क्यांनी वाढत असतील तर आम्ही जास्त दर का मागू नये? सरकारने खताच्या किंमतीवर नियंत्रण का ठेवले नाही? आता शेतकऱ्यांना न दिलेले पैसे विधानसभेला उधळले जाणार. जर शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर कारखानदारांना ठेवणार नाही,असा सज्जड दमही दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या साखर कारखानदाराकडून अजित पवारांनी हमी पत्र का मागू नयेत असा सवालही त्यांनी केला. कारखाना काढताना भरमसाठ कर्ज उचलली जातात, पण ती विकताना कवडीमोल भावाला विकतात, अशी नाराजीही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.