आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, राष्ट्रीय रोगनियंत्रण अधिकारी कार्यालय, सार्वजनिक शिक्षण विभाग आणि तालुका आरोग्याधिकारी कार्यालय बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डास प्रतिबंधक दिनानिमित्त डास नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले . यावेळी बेळगाव शहर आणि ग्रामीण ४६ शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रसंगी डांसापासून पसरणाऱ्या रोगाविषयी सांगून , उपाय योजना तसेच प्रात्यक्षित दाखविण्यात आले .
या कार्यक्रमाचे उद्धघाटन शिक्षण विभागाच्या संयोजिका गीता तिगडी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे, जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी डॉ. एम.एस.पल्लेद, जिल्हा क्षयरोग नियंत्रण आधिकारी डॉ. चांदणी देवडी,तालुका आरोग्याधिकारी डॉ शिवानंद मास्तिहोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









