सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील कचरा गोळा करण्यासाठी आमदार निधीतून खरेदी केलेल्या सहा इलेक्ट्रिक गाड्या अवघ्या काही महिन्यात भंगारात पडल्या आहेत. या गाड्या कुठेही पलटी होत असल्याने त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. सुमारे तीन लाख रुपये एका गाडीची किंमत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे असा आरोप माजी नगरसेवक राजु बेग यांनी केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गाड्या कंपनीला परत करण्याच्या सुचना केल्या आहेत. तरी त्या परत का केल्या नाहीत असा सवालही बेग यांनी केला आहे.









