हिंडाल्कोचे समभाग दोन टक्क्यांनी मजबूत : अदानी एटरप्रायजेसचे समभाग 6 टक्क्यांनी प्रभावीत
मुंबई
चालू आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी भारतीय भांडवली बाजारातील कामगिरीमध्ये तेजीचा कल कायम राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये दिवसभरात काहीसे चढ-उताराचे वातावरण राहिले होते. पंरतु अंतिम क्षणी भारतीय बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 213.27 च्या मजबुतीसोबत 65,433.30 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 47.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,444.00 वर स्थिरावला आहे. या दरम्यान अदानी एंटरप्रायजेसचे समभाग हे सर्वाधिक सहा टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. तसेच हिंडाल्को व अॅक्सिस बँक यांचे समभाग हे 2 टक्क्यांनी वधारले आहेत.
सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, मारुती सुझुकी आणि टाटा स्टील यांचे समभाग हे 1 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये जिओ फायनाशिअलचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 5 टक्क्यांपेक्षा अधिकने प्रभावीत झाले. यासोबतच सनफार्मा, भारती एअरटेलचे समभाग हे 1 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह टाटा मोर्ट्स, टेक महिंद्रा, आयटीसी , अल्ट्राटेक सिमेंट,महिंद्रा अॅण्ड महिंद्रा , विप्रो, एशियन पेन्ट्स, टायटन आणि इंडसइंड बँक यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत.
या क्षेत्रांची कामगिरी :
बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांच्या कामगिरीत विविध क्षेत्रांचे योगदान म्हत्वाचे राहिले आहे. यात बँक, धातू आणि कॅपिटल गुड्समध्ये 0.5 ते 1 टक्क्यांची तेजी पहावयास मिळाली आहे. तसेच ऊर्जा, एफएमसीजी, ऑईल व गॅसमध्ये 0.3 ते 1 टक्क्यांनी प्रभावीत झाले. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांकही तेजीत राहिले आहेत.









