वृत्तसंस्था/ पॅरीस
सोमवारी येथे घोषित करण्यात आलेल्या पुरुष टेनिसपटूंच्या एटीपी ताज्या मानांकन क्रमवार यादीत स्पेनच्या कार्लोस अॅलकॅरेझने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र नजीकच्या काळात या अग्रस्थानासाठी पुन्हा अॅलकॅरेझ आणि जोकोविच यांच्यात चुरस राहिल.
या ताज्या मानांकन यादीत स्पेनचा अॅलकॅरेझ 9395 गुणासह पहिल्या, सर्बियाचा जोकोविच 8795 गुणासह दुसऱ्या, रशियाचा मेदव्हेदेव 6530 गुणासह तिसऱ्या, ग्रिसचा सित्सिपस 5090 गुणासह चौथ्या, डेन्मार्कचा रुने 4790 गुणासह पाचव्या, इटलीचा सिनेर 4725 गुणासह सहाव्या, नॉर्वेचा रुड 4715 गुणासह सातव्या, रशियाचा रुबलेव्ह 4595 गुणासह आठव्या, अमेरिकेचा फ्रिझ 3605 गुणासह नवव्या तर अमेरिकेचा टिफोई 3050 गुणासह दहाव्या स्थानावर आहे.









