मुंबई
ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटलचा आयपीओ लवकरच सादर करण्यात येणार असून यापूर्वी कंपनीने 123 कोटी रुपयांची उभारणी करण्यात यश मिळवलं आहे. 735 रुपये प्रत्येकीप्रमाणे कंपनीने गुंतवणूकदारांना 16.7 लाख समभाग देऊ केले असल्याची माहिती आहे. कंपनी आयपीओअंतर्गत 615 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग आणि 44 लाख इक्विटी समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटलला पश्चिम भारतात विस्तार करायचा आहे. ठाणे, पुणे व इंदोर येथे यांची हॉस्पिटल्स आहेत.









