पुलाची शिरोली प्रतिनिधी
सांगली फाटा ते पंचगंगा नदी पर्यंत होणाऱ्या सहा पदरी रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्याकडून सोमवारी पाहणी करण्यात आली. यारस्त्यादरम्यान एक मोठे उड्डाणपुल बांधण्याची मागणी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींच्याकडून करण्यात आली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुणे बंगलोर या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या सहा पदरी रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत सध्या असलेल्या भराव्यामुळे पंचगंगा नदीला बेटाचे स्वरूप येऊन पुलाची शिरोली, शिये या गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे. भविष्यात होणाऱ्या या रस्त्याच्या कामात सुधारणा होऊन सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत किंवा मोहर्याचे बांधकाम करावे अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केले होती. यावेळी गडकरी यांनी तेरा पिलर फुल किंवा मोहरी बांधकाम करण्याची तत्वता मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने सोमवारी रस्ते विकास प्राधिकरणचे अधिकारी राजा माने यांनी भेट देऊन पाणी केली यावेळी त्यांनी सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत ३ × ४ मिटर अशा मापाचे दहा ते बारा मोहरी (बोगदे) ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित माजी उपसरपंच कृष्णात करपे, योगेश खवरे, बाजीराव पाटील, धनाजी पाटील, उपसरपंच अविनाश कोळी यांनी या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा माने यांना सांगून या ठिकाणी सांगली फाटा सारखे एक उड्डाणपूल बांधण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. कारण पंचगंगा नदी शेजारी शेकडो एकर ऊस पीक आहे. या शेतातील पिकांची ने – आन करणे व शेतकऱ्यांना ये – जा करण्यासाठी मोठ्या उड्डाणपुलाची आवश्यकता असल्यामुळे ते बांधण्यासाठी आपण शिफारस (रिपोर्ट)द्यावी. अशी मागणी उपस्थित शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली.यावेळी बाळासाहेब पाटील, विजय जाधव, श्रीकांत कांबळे, संभाजी पाटील, भगवान पाटील, महमद महात, सचिन समुद्रे,अमोल तिरपणे आदी उपस्थित होते.









