कुडची येथे कृष्णा नदीत बुडाला : दर्ग्याच्या दर्शनाला आल्यावेळी घडली होती दुर्घटना
वार्ताहर /कुडची
कुडची येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी आलेला बेळगावातील एक तऊण कृष्णा नदीत रविवारी दुपारी बुडाला होता. त्याचा मृतदेह 27 तासांनी सापडला. हुसेन निसारअहमद अरकट्टी (वय 22) रा. न्यू गांधीनगर बेळगाव असे बुडून मृत झालेल्या तऊणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, बेळगाव येथील दहा ते बारा जण कुडची येथील हजरत शेख शिराजुद्दीन जुन्नेदी या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी रविवारी आले होते. येथे आल्यानंतर दर्शन घेऊन नदीकाठावर असलेल्या घाटाजवळ जेवण करून बसले होते. घाटावर नदीकाठी बसलेल्यांपैकी तिघेजण नदीत पडले. तिघांनाही पोहता येत नव्हते. तरीही यावेळी तेथे असलेल्या एका तऊणाने दोघांना वाचविले होता. तोपर्यंत तिसरा बुडाल्याने त्याचा शोध लागत नव्हता. रविवारी संध्याकाळपासूनच विविध पातळीवर त्याचा शोध सुरू होता. रात्री उशिरा झाल्याने शोध थांबवून आज सकाळपासून शोधमोहिम सुरू झाली होती. कालपासूनच घटनास्थळी कुडची पोलिसांनीही येऊन माहिती घेतली होती. सकाळपासून अग्निशामक दल, पोलिस, स्थानिक नागरिक यांनी प्रयत्न सुरू केले होते. शोध कार्यासाठी गुंडवाड येथून एक बोटही मागविली होती. दिवसभर शोध सुरू होता. रविवारी चार वाजल्यापासून सुरू असलेला शोध आज संध्याकाळी सात वाजता संपला. सोमवारी बेळगावातून विशेष टीमही मागविण्यात आली होती. संध्याकाळी 7 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
कॅमेराद्वारे शोधकार्य
मृतदेह शोधून काढण्यासाठी अग्निशामक दल व स्थानिक तऊण प्रयत्न करत असतानाही सोमवारी बेळगावातून विशेष पथक मागविले होते. त्यांच्याकडे असलेल्या कॅमेऱ्यातून मृतदेहाचा शोध लागला. तो बाहेर काढण्यासाठी संध्याकाळी सात वाजले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कुडची सरकारी ऊग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









