वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या सिनसिनॅटी मास्टर्स पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या ज्योकोव्हिचने पुरूष एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना स्पेनच्या टॉप सिडेड अॅलकॅरेझचा पराभव केला. तसेच या स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना मुचोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 6 व्या मानांकीत गॉफने 17 व्या मानांकीत मुचोव्हाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. 2023 च्या हंगामातील गॉफचे हे तिसरे जेतेपद आहे. हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेतील गॉफचे हे दुसरे विजेतेपद आहे. गेल्या जानेवारीमध्ये गॉफने आकलंडमधील स्पर्धा तर त्यानंतर दोन आठवड्यापूर्वी वॉशिंग्टन डीसी टेनिस स्पर्धा जिंकली होती.









