वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी (अमेरिका)
सिनसिनॅटी मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कॉर्लोस अॅलकॅरेझ आणि सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविच यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे.
गेल्या जुलै महिन्यात झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जोकोविच आणि अॅलकॅरेझ यांच्यात चुरशीचा अंतिम सामना झाला होता आणि अॅलकॅरेझने जोकोविचचा पराभव करत पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळवले होते. पुन्हा या दोन अव्वल टेनिसपटूंमध्ये अंतिम लढत होत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने जर्मनीच्या वेरेव्हचा 7-6(7-5), 7-5 तर टॉप सिडेड अॅलकॅरेझने हुरकेझचा 2-6, 7-6(7-4), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.









