वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधान परिषदेत आता विरोधी पक्षनेते म्हणून हरि सहनी दिसून येणार आहेत. भाजप आमदार सहनी यांना ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. बिहार भाजप अध्यक्ष सम्राट चौधरी यांना या निर्णयाची माहिती दिली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यावर सहनी यांनी राज्यातील महाआघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यात आता गुन्हेगारीने डोकं वर काढले असून कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. नितीश कुमार यांचे सरकार केवळ स्वत:ची आघाडी वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. काका-पुतण्या स्वत:चे नाते टिकविण्यात व्यग्र असल्याने बिहारच्या जनतेच्या दुर्दशेकडे त्यांचे किंचितही लक्ष नाही. राज्य सरकारला आता जनताच धडा शिकविणार असल्याचे सहनी यांनी म्हटले आहे. हरि सहनी यांच्यापूर्वी सम्राट चौधरी हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी होते.