ब्रेडने तयार केला जातो टॉवर
हाँगकाँगमध्ये चेउंग चाऊ बन फेस्टिव्हल जवळपास एका आठवड्यापर्यंत चालतो, ज्यात प्रसिद्ध बन स्क्रॅम्बलिंग स्पर्धेसोबत पारंपरिक परेड होते. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी परेड आयोजित होते आणि त्यादिवशी सार्वजनिक सुटी असते. हा उत्सव पाहण्यासाठी बेटाचा दौरा केला जातो आणि पहिले दोन दिवस अणि तिसऱ्या दिवशी सकाळी केवळ शाकाहारी आहाराचा समावेश केला जातो.

या उत्सवादरम्यान सहभागी लोक बन्सनी झाकले गेलेले 60 फूटांचे बांबूचे विशाल टॉवर जिंकण्यासाठी परस्परांना भिडतात आणि शक्य होतील तितके बन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. या आयोजनासाठी 60 हजारांहून अधिक बन्स तयार केले जात असतात. चेउंग चाऊसाठी हा उत्सव मुख्य आकर्षण असून यात हाँगकाँग आणि जगभरातील अनेक पर्यटक भाग घेत असतात. याला ‘दा जिउ’ उत्सव असेही म्हटले जाते.
हा सण आता पुढील वर्षी 15 मे रोजी साजरा केला जाणार आहे. बन महोत्सव हा बौद्ध सण असून तो एक ताओवादी सण आहे, जो उत्तर दिशेचे देवता आणि मच्छिमारांचा संरक्षक पाक ताई यांच्या भक्तिपोटी साजरा केला जातो. या देवतेने प्लेगची महामारी अन् सागरी चाच्यांच्या समस्येपासून मुक्ती मिळवून दिल्याची वदंता तेथे आहे.









